
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – गद्दाराच्या गाडून पुन्हा भगवे वादळ निर्माण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्ट रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर दुपारी २ वा. जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक जाहीर सभेचे साक्षीदार होण्यासाठी लोहा-कंधार तालुक्यातील शिवसैनिकानी सभेला उपस्थित राहण्याचे आव्हान किसानसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर यांनी सिंहगड शिवसेना कार्यालयात आयोजित बैठकीत केले आहे.
या बैठकीला किसानसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आंडगावकर, अमर सय्यद तालुकाप्रमुख अल्पसंख्यांक आघाडी संतोष पाटील यडाळे,रुपेश पा पवार ,संग्राम पाटील,मनिष कऱ्हाळे,अंगद शिंदे,सदाशिव डोंगरगावे, शिवसागर बगाडे,अमर पवळे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.