
शेतीशाळेत पिंकावरील रोग व फवारणीचे केले मार्गदर्शन…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – सध्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावला असुन कृषी विभागामार्फत थेट बांधावर जाऊन राज्य पुरस्कृत उत्पादन वाढ मुल्य साखली योजने अंतर्गत सोयाबीन व कापूस या पिकाविषयी शेतीशाळा घेण्यात आली.
लोहा तालुक्यातील सोनमांजरीकर येथे शेतकरी बांधवांच्या थेट बांधावर लोहा येथील कृषी विभागाने कृषी अधिकारी पोटपेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन कापूस , यावर होणारी किड व रोग विषयी कृषी विभागाने फवारणी किट देऊन महीती दिली व औषधांच्या किटचे वाटप केले.
लोहा तालुका कृषी विभागाच्या शेतीशाळेला कृषी सहाय्यक संतोष सोनवळे , सोनमांजरीचे सरपंच सखाराम लोंढे , ग्रामपंचायत सदस्य नितीन लोंढे, ग्रामपंचायत सदस्य भगवान गाडेकर , गावातील शेतकरी परसराम लोंढे , राजाभाऊ लोंढे, सचिन रायफळे , अंकुश ढेंबरे , आनंदा मोरखिळे , सोपान लोंढे , सुरेश गिरी सह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.