
देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन मशीन धुळखात…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड(देगलूर):सरकारने जनतेच्या सेवेसाठी शासकीय दवाखान्याच्या मोठमोठ्या इमारती बांधून अनेक तज्ञ डॉक्टरांची भरती करून तमाम जनतेच्या सेवेत दिल्या आहेत
आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णालयात मोफत सुविधा रुग्णाला मिळत असताना रुग्णाचा तात्काळ इलाज व्हावा म्हणून जनसामान्य माणूस खाजगी रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात वळत असले तरी सदरच्या दवाखान्यां मध्ये गोरगरीब जनतेच्या खिशातून शेकडो रुपयांच्या वर खाजगी रुग्णालयाचे बिल होताना दिसून येत आहे .
सर्वात महत्वाची बाब म्हणजे देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक दिवसापासून धुळखात पडलेली सिटीस्कॅन मशीन व इतर मशीन याकडे आरोग्य विभागाचे सर्रास दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे .तसेच रुग्णालयात औषध पुरवठा कमी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे नाईलाज स्थव देगलूर शहरातील व तालुक्यातील गरीब जनता खाजगी रुग्णालयाकडे वळतात की काय ? असा ही प्रश्न जनतेला भेडसावत असून शासनाने जनतेच्या सेवेसाठी मोठा वाजागाजा करून मोफत दवाखान्यात सेवा देत आहे असे जाहीर केले आहे .पण देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये चित्र वेगळे बघायला दिसत आहे . देगलूर तालुक्यातील रुग्णांना सिटीस्कॅनसाठी खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन सिटीस्कॅन व इतर टेस्ट करण्यासाठी
लाखो रुपयाची बिले भरत असताना दिसून येत आहे. परंतु शासनाच्या मोफत सुविधेचे काय ? शासकीय आरोग्यच्या सुविधेबद्दल वळत नाहीत असा ही प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहे.
गोरगरीब जनतेने तरी शासकीय दवाखान्यां मध्ये जास्तीत जास्त उपचारासाठी दाखल होऊन विलाज करून घेतला पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे.पण देगलूर उपजिल्हा रुग्णालया मध्ये एका पेक्षा एक तज्ञ डॉक्टर असताना सुद्धा ग्रामीण भागातील जनसामान्य माणसाची ओढ खाजगी दवाखाना कडे लागली असल्यामुळे गोरगरिबांची चांगलीच वाट लागत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे.
प्रशासनाने व आरोग्य विभागाने देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त औषधाचा पुरवठा व विविध सुविधा तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. असे देगलूर तालुक्यातील जनतेमध्ये बोलले जाते.