
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (लोहा) :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती सोहळा जोमेगांव ता. लोहा जि. नांदेड येथे दिनांक २९ऑगस्ट रोज मंगळवारी सकाळी ठीक ९ वाजता श्रीमती गोदावरी शिंदे सरपंच जोमेगांव यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होईल. प्रमुख पाहुणे आमदार श्री श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव पाटील शिंदे( काँग्रेस उपाध्यक्ष नांदेड जिल्हा )सुभाष गायकवाड( मा.जि.प.सदस्य) शिवराज शिंदे (भाजप नेते) आदिनाथ शिंदे (माजी सरपंच) गुलाब शिंदे तसेच सकाळी ठीक दहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप वाघमारे ,सपना भुरे अश्विनी शिंदे श्रीमती कमलबाई शिंदे, सौ. पदमीनबाई गव्हाणे ,पंडित कापसे, सौ. भाग्यश्री शेटे ,संतोष आस्कूलकर (तलाठी) मारोती पांचाळ (पोलीस पाटील) प्रभाकर शिंदे (तंटामुक्ती अध्यक्ष) दमयावार सर ,कांबळे सर, जांबकर मॅडम, चंद्रकांत शिंदे (शालेय समिती अध्यक्ष),मनोहर भुरे ,कृष्णा शिंदे पत्रकार, प्रभाकर शिंदे ,गुणवंत शिंदे, बालासाहेब शिंदे पत्रकार ,गणपती शिंदे, बालाजी पवार ,गजानन पांचाळ ,संजय भुरे ,सुभाष पवार, श्रीमती देऊबाई कापसे ,यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती जोमेगाव येथे पार पडणार आहे तरी परिसरातील जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहून जयंती मंडळास सहकार्य करावे असे जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकारी व गावकरी मंडळी जोमेगांव यांनी कळविले आहे.