
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (पिंपळदरी) :- पिंपळदरी ता. लोहा जि.नांदेड येथील ग्रामस्थांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी ग्रामसभा घेऊन सर्व प्रकारच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना व दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाला आणि नांदेड जिल्हातील अनेक गावात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला सर्व गावकऱ्यांच्या मागणी नुसार ग्रामसभेचे आयोजन करून.मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत सर्व प्रकारच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला असून कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यांना गावात प्रवेश निषेध करण्यात आला आहे.यावेळी पिंपळदरी येथील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सरपंच प्रतिनिधी, सकल मराठा समाज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.