
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा दवणे…
जालना (मंठा):-तालुक्यातील सोनूनकरवाडी येथील गोपाळ कृष्ण मित्र मंडळ उत्सव यांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपली परंपरा जपण्यासाठी गोपाळ कृष्ण मित्र मंडळ मार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात हे वर्ष सातवे वर्ष असून मोठ्या उत्साहामध्ये हजारो नागरिकांच्या साक्षीने दहीहंडी उत्सव संपन्न झाला.
कार्यक्रमाची
सुरुवात बालश्रीकृष्ण प्रतिमा पूजन करून करण्यात आली..कार्यक्रमासाठी उद्घाटक तुळशीराम गायकवाड सरपंच ठेंगेवडगाव उद्धव धनगर सरपंच सोनूनकरवाडी विष्णू गायकवाड मा. सरपंच अशोक कालापाड पंडित गायकवाड बिटू भाऊ गडदे अमोल गायकवाड अमोल राठोड विकास गव्हाणे दत्ता गायकवाड, मुरली धनगर जीवन कुलाल यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी अध्यक्ष श्री कैलास गव्हाणे बोलतांना म्हणाले आपली संस्कृती वारसा जपण हे आपलं कर्तव्य आहे
अनेक उत्सव काळाच्या ओघात मागे पडत आहेत आपले सण उत्सव हे कुठल्याही देशाला लाभले नाही फक्त भारतातच उत्सव यात्रा सणवार साजरे केले जातात यामाध्यमातून आपणं आपली भारतीय संस्कृती जतन करुया असे मनोगत व्यक्त केले यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बालगोपाळ व तरुणांनी गोविंदाच्या गाण्यावर ठेका धरून नृत्य केले. परिसरातील अनेक अॅ गोविंदा पथकाने सहभाग घेऊन मानाची सलामी दिली. यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान डोळेपांगरा लोणार पथकाने पटकावला. व प्रथम क्रमांक मिळवला तर दुसरा क्रमांक सोनंकरवाडी येथील पथकाने पटकावला.