
येलूर ते टेंभुर्णी रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरू करण्याचे दिले आश्वासन
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार –भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांना भेटुन येलुर ते टेंभूर्णी रस्त्याच्या कामा निमित्ताने सविस्तर चर्चा करण्यात आली . येल्लुर येथील सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या दोन दिवसा मध्ये काम सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यामुळे येल्लुर येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला असून सर्व परिसरातील शेतकऱ्यांची सोय होणार आहे.शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे गोजेगावकर साहेब यांच्या सोबत सतत संपर्कात राहुन आपल्या गावचे काम करुण घेण्या माघचे प्रयत्नशील म्हणून युवा नेते भारतीय जनता पार्टी जिल्हा सहसंयोजक ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांच्या माध्यमातून वेळोवेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या संपर्कात राहुन हा शेतकऱ्यांचा विषय मार्गी लावला असून भाजपा नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांचे शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे .या वेळी उपस्थित उप सरपंच एकनाथ पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील आकरगे ,सेक्रेटरी रामजी पाटील शिंदे ,मा चेअरमन सिताराम पाटील ,बाबाराव पा आकरगे, धडाडीचे नेतृत्व गोविंद पाटील आकरगे ,माधव पाटील आकरगे ,बालाजी पाटील शिंदे, नामदेव पाटील शिंदे, भगवान पाटील शिंदे ,दादाराव पाटील आकरगे ,ऋषिकेश पाटील शिंदे ,आनंद पाटील आकरगे ,गणेश पाटील आकरगे ,दत्ता पाटील आकरगे गोजेगावकर साहेब समर्थक उपस्थित होते.दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे व्यंकटराव पाटील यांनी सांगितले आहे.