
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)-मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून अनेकदा फसवणूक होत असल्याचे समोर आले आहेत. अशा अॕप्सबाबत सावध राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.सायबर दोस्त ज्यामध्ये हनीफॉल लोन अॕप हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हनीफॉल अॕप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आतापर्यंत सुमारे 10 हजार लोकांनी ते डाउनलोड केले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हे अॕप तुमच्या फोनवर डाऊनलोड केले असेल तर ते त्वरित डिलीट करावे.सायबर दोस्त हे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे वेळोवेळी सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत अलर्ट देत असते. हे पोर्टल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ‘सायबर दोस्त’च्या पोस्टनुसार, हनीफॉल अॅप एका खास कोडसह डिझाइन केले गेले आहे. जेव्हा एखादा युजर फोनवर हनीफॉल डाउनलोड करतो, तेव्हा मॅलेशियल कोडच्या मदतीने हॅकर्स फोनचा ताबा घेतात. यानंतर तुमच्या फोन डेटाच्या मदतीने बँक फसवणुकीच्या घटना घडू शकतात. व Spice Money हे ॲप इंस्टॉल करू नका हे स्कॅमर द्वारे बनवले गेले आहे.हे सर्वात आधी ज्या मोबाईल मध्ये इंस्टॉल होईल तो त्या मोबाइल चा anydesk सारखं ॲक्सेस घेतो आणि तुमच्या फोन पे किंवा इतर कोणतेही ॲप चे upi पिन हॅक करतो नंतर तुम्ही मोबाइल कुठे ठेवला की तो ऑटोमॅटिक तुमचे पैसे काढून घेतो आणि तुमच्या गॅलरी मध्ये जे फोटो प्रायव्हेट असतात ते पण घेतो आणि नंतर जेव्हा तुमच्या खात्याला पैसे राहिले नाही तर तो तुम्हाला त्या खात्यात परत पैसे टाकण्यास सांगतो जर नाही टाकले तर तुम्हाला ब्लॅकमेल करतो व सर्व बँक खाते साफ करायचे काम करत आहे.या पासून तुम्ही कसे वाचवू शकता. सर्वात प्रथम हे ॲप अनइंस्टॉल करा.त्यानंतर आपले यू पी आय पिन बदलून घ्या.मोबाईल रिस्टार्ट करा सर्वात प्रथम तुम्हाला आपले UPI पिन बदलायचे आहे जर तुमचा मोबाईल हॅक करून पैसे काढले गेले आहे.तर आपल्या जवळच्या पोलिस स्टेशन ला जावून सर्व माहिती सांगा.आणि जास्त रक्कम गमावली असेल तर आपल्या जिल्ह्याच्या सायबर पोलिस स्टेशन ला जा आणि याची लेखी तक्रार करा. कृपया सावध रहा सतर्क रहा असे एक मेकांना सागण्यात येत आहे.
मोबाइल हाताळताना फेक अप्लिकेशन पासून सावध राहावे, कोणतेही अप्लिकेशन डाउनलोड करतांना त्याचे डिस्क्रिप्शन आणि अधिकृत रिव्ह्यूज वाचूनच ते वापरावे.
आवश्यकता नसल्यास कोणतेही स्क्रीन शेअरिंग अप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये. बहुतांश पेयमेन्ट फ्रॉड हे ह्याच अप्लिकेशनच्या साहाय्याने केले जातात. ह्या अप्लिकेशन द्वारे तिऱ्हाईत व्यक्ती आपल्या फोनला इंटरनेटच्या माध्यमातून हाताळू शकतो.
कोणत्याही प्रकारचा ओटीपी हा शेअर केला जाऊन नये, सध्याच्या डिजिटल युगात ओटीपी ला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणतीही आस्थापना किंवा प्रणाली आपला ओटीपी शेअर करण्यास सांगत नाही त्यामुळे आपल्याकडे कोणी ओटीपीची मागणी करत असल्यास ती करू नये.
कोणत्याही लिंकची सत्यता आधी अधिकृत असल्याची खात्री केल्याशिवाय त्यावर व्यक्तिगत माहिती देऊ नये. नुकतंच महा सायबर द्वारे काही लाख यूजर्स चा डेटा हा बनावट नोकरी पोर्टल द्वारे चोरी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे अशा बनावट लिंक पासून सावध राहणे गरजेचे आहे.