
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“शेतकरी बांधव विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरू शकले नव्हते”
रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती, मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरू शकले नाहीत, याचा विचार करून कृषीमंञी ना.धनंजयजी मुंडे साहेबांनी केंद्राकडे विनंती केली असता, दि.४ व ५ डिसेंबर या दोन दिवसात वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून योजनेत सहभाग घ्यावा.
असे आव्हान महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री धनंजयजी मुंडे यांनी केले आहे.