प्रतिनिधि/राखी मोरे
दै.चालु वार्ता/पुणे
पुण्यातुन शेगाव जाणाऱ्या भाविकांसाठी व प्रवासी यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी महामंडळाने पुण्यासाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून पुणे येथील शिवाजीनगर- वाकडेवाडी येथील बस डेपो मधून शेगावसाठी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी पाच डिसेंबर 2023 पासून ही नवीन स्लीपर बस सेवा सुरू झाली आहे. यामुळे पुण्याहून शेगाव नगरीला जाणाऱ्या भाविकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये पुण्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या उल्लेखनीय आहे. यामुळे या मार्गावर नवीन स्लीपर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. एस टी महामंडळाच्या या नवीन स्लीपर बस सेवेमुळे भाविकांना स्वस्तात आरामदायी प्रवास करता येणार आहे. दरम्यान आता आपण या नवीन स्लीपर बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुण्याहून शेगाव साठी दररोज ही स्लीपर बस सोडली जाणार आहे.एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील स्लीपर बसने प्रवास करण्यासाठी 990 रुपये एवढे फुल तिकीट राहणार आहे. तसेच या प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सवलती देखील लागू केल्या जाणार आहेत. पुण्यातील शिवाजीनगर अर्थातच वाकडेवाडी येथील बस डेपो मधून दररोज रात्री नऊ वाजता ही स्लीपर बस शेगाव कडे रवाना होणार आहे. ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शेगाव येथील बस डेपोवर पोहोचणार आहे. ज्या नागरिकांना सवलतीच्या दरात एस टी महामंडळाच्या इतर बसमधून प्रवास करता येत आहे त्या नागरिकांना या एसटीमधूनही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.