
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 19 डिसें नवी सांगवी (पुणे )
नव्या सांगवीत एकही सुलभ शौचालय नाही त्यामुळे बाहेरगावावरून येणारे नागरिक तसेच स्थानिक व्यापारी महिला यांची कुचंबना होते. तीन-चार सुलभ सौचालयाची अत्यंत गरज आहे, पर्याय काही नसल्यामुळे खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह ग्रस्त नागरिक,व्यावसायिक याची हि कुचंबणा होते. तरुण-पुरुष तरी कुठेतरी आडोसा धरून पीडब्ल्यूडी च्या मैदानात जाऊन येतात किंवा जागा मिळेल त्या ठिकाणी अडचणीच्या वेळेस पर्यायी मार्ग काढतात पण महीलांनी काय करायचे आणि मधुमेहींना वारंवार लघुशंकेसाठी जावे लागते. सर्वच व्यावसायिककडे शौचालयाची सोय असेलच असे नसते किंवा जर लहान व्यवसायिकाला जायचे असेल तर दुकान बंद ठेवून घर जवळ असेल तर जातील पण घर लांब असेल तर काय करायचे असा उद्दीग्न प्रश्न जोगदंड यांनी प्रशासनाला विचारला आहे.
महिला खरेदीसाठी आल्यावर शौचालयाची विचारणा करतात अशावेळी आम्ही ही काहीही करू शकत नाहीत. त्यांना अनेक समस्यांच्या सामोरे जावे लागते नव्या सांगवीत कमीत कमी एसएम काटे चौक, साई चौक ,एम के.चौक, कृष्णा चौक ,माहेश्वरी चौक अशा गर्दीच्या ठिकाणी जागा शोधून किंवा पालिकेने अधिकृत केलेल्या पार्किंगच्या रस्त्याच्या कडेला कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी सुलभ शौचालयाची सोय करण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण जागृती शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी ह क्षेत्रिय अधिकारी उमेश ढाकणे यांच्याकडे केली आहे.
यावेळी लक्ष्मी सुवर्णकारचे मालक दीपक शहाणे म्हणाले की आम्हाला सुद्धा दुकान बंद करून घरी जावे लागते किंवा आमच्याकडे कोणी ग्राहक आले तर आलेल्या महिला नागरिकांनी आमच्या कडे विचारणा केल्यास आम्ही हतबल होऊन असर्मथता दाखवतो वाईट वाटते पालीकेने गांभीर्याने हा विषय घ्यावा .
पि.चि.मनपा स्वच्छ भारत अभियानांतर्गत रस्त्यावर लघूशंका करणारे व अस्वच्छता करणाऱ्यावर 34 लाखाचा दंड केल्याचे वाचणात आले. यामध्ये लघूशंकेसाठी 500 रूपये तर सार्वजनिक ठिकाणी शौच केल्यास 1000 रू.दंड आकारला जातोय पण ज्या ठिकाणी सोयच नाही त्या ठिकाणी पालिकेचे आरोग्य आधिकारी यशवंत डांगे व ह प्रभागाचे विकास ढाकणे साहेब लक्ष देतील काय? कार्यवाही करा पण सुविधा पण द्या. अशी मागणी ह प्रभाग आधिकारी विकास ढाकणे यांच्या कडे निवेदनातून केली आहे.त्यांनी लवकरात लवकर सांगवी चा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
निवेदनावर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, शहराध्यक्षा मीना करंजावणे, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष. मुरलीधर दळवी, गणेश वाढेकर ,पंडीत वनसकर यांच्या सहया आहेत.
फोटोवळः-मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने निवेदन देतांना. पदाधिकारी.
क्षेत्रीय आधिकारी उमेश ढाकणे.
8830829011