दैनिक चालू वार्ता
दौंड प्रतिनिधी प्रवीण पवार :-9923531092
दौंड. मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील सर्व बालिकांची पालकांच्या हस्ते पूजन करून साजरा करण्यात आला तसेच या बालिका पूजनाच्या निमित्ताने पालकांनी मुलींना सूचक संस्कारक्षम मूल्यवर्धक भेट देण्याचे आव्हान शाळेने पालकांना केले होते .याचे स्वागत करून सर्व मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींना सुंदर सुंदर भेट वस्तू दिल्या श्री. गुरुदेव गोरोबा स्मारक समितीचे सचिव सुभाष गणपत डावरे , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता सुभाष डावरे, मुख्याध्यापक संभाजी शंकर थोरात, सर्व शिक्षक व पालक यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा .कविता सुभाष डावरे व शाळेतील सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी अहिवळे, यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती वाघ यांनी केले…
