
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला ह. भ. प. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या 54 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अशी मिरवणूक आपल्याला काढायची आहे. तरी सर्वानी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सकाळी 10:00 वाजता नगरेश्वर मंदिर लोहा येथे उपस्थित राहावे. आनि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी मागील दोन ते तीन वर्ष कोरोना काळ असल्याने आपण मिरवणूक काढू शकलो नाही पण या वर्षी भव्य अशी मिरवणूक आपण काढणार आहोत असे नगरेश्वर मंदिर लोहा समिती तर्फे कळविण्यात आले आहे. सदरील ही मिरवणूक सकाळी 10:30 वाजता नगरेश्वर मंदिर लोहा येथून निघणार आहे. मिरवणुकीत सर्व पुरुषांनी पांढरा ड्रेस घालावा अणि टोपी ही मंदिरा तर्फे देण्यात येणार आहे. मिरवणूक ही नगरेश्वर मंदिर पासून निघून मोंढा गणपती मंदिर येथे जाऊन पुन्हा माऊली नगर त्यानंतर वापस नगरेश्वर मंदिर येथे येणार आहे त्यानंतर लगेचच महाप्रसादास सुरवात होणार आहे तरी सह कुटुंबानी लाभ घ्यावा असे नगरेश्वर मंदिर समिती तर्फे कळवण्यात आले आहे.