दै.चालु वार्ता
पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान, पैठण आयोजित एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन अकॅडमीच्या दहाव्या पक्षी महोत्सवाचे आयोजन 30 जानेवारी 2024, मंगळवार रोजी पैठणला होत आहे. पैठणला जागतिक दर्जाचे जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. जगभरातून येथे विविध पक्षी या जलाशयाच्या परिसरात येतात. या पक्ष्या़बाबत शास्त्रीय माहिती उपलब्ध व्हावी, जागरुकता वाढावी, स्थानिकांचा सहभाग वाढावा यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र, पर्यावरण तज्ज्ञ, इन्व्हायरमेंट रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकादमीचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी, आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रा. संतोष तांबे, देवेंद्र इनामदार, विरंगुळा संस्थेचे सचिव प्रा.संतोष गव्हाणे, पक्षीमित्र दिलीप भगत, कुणाल विभांडिक, मदन आव्हाड आदींनी ही माहिती दिली.
या महोत्सवानिमित्त पक्षी चित्रकला आयोजित करण्यात आली आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षी निरीक्षण, छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन होणार आहे.
चित्रकला स्पर्धा विषय…
जायकवाडी पक्षी अभयारण्यातील मी पाहिलेला पक्षी या विषयावरील चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. दिनांक 28/01/2024 रोजी सायंकाळी पाच वाजे पर्यंत दिलीप भगत यांच्याकडे चित्र द्यावेत. दिनांक 30 तारखेला माहेश्र्वरी भक्त निवास, उद्यान रोड, पैठण येथे प्रदर्शन होईल. आणि सकाळी पक्षी महोत्सव उद्घाटन सोहळ्यात बक्षीस दिले जातील.
-दिलीप भगत 9423870750