
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यातील वारकरी भक्तांना सुविधा सुव्यवस्था मिळव
दै. चालु वार्ता प्रतिनिधीपुणे/पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
भारताच्या महाराष्ट्राच्या इतर परराज्यातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना
जगद्गुरु संत तुकाराम महाराज ३३९ व्या आषाढी पायी वारी सोहळा अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भक्तांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ,सर्वत्र स्वच्छता ,शुद्ध पिण्याचे पाणी ,अखंडीत विद्युत पुरवठा ,निवारा ,वैदयकीय सेवा ,वाहतूक व्यवस्था ,कायदा व सुव्यवस्था आदी विभागांनी योग्य पद्धतीच्या नियोजनाचा आखाडा तयार करावा.त्यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमून या नोडल
अधिकाऱ्यांसह महत्वाच्या अधिकाऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवावा.त्यावर प्रत्येक अडचणी आणि समस्यांची माहिती टाकावी ,जेणे करून तत्काळ त्या अडचणी सोडविता येतील अशा सूचना पिंपरी चिंचवडचे तहसिलदार जयराज देशमुख यांनी दिल्या.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील भक्ती निवास मध्ये अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ( ता.१८) रोजी आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत देशमुख यांनी वरील सूचना दिल्या. तसेच अनगडशहा बाबा दर्ग्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते ,त्या बाबत योग्य ते पोलिसांनी नियोजन करावे.या बैठकीस संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे,संतोष मोरे ,विशाल महाराज मोरे ,विश्वस्त भानुदास महाराज मोरे,नायब तहसीलदार प्रवीण ढमाले ,मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, जयश मोरे,देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण तनपुरे , पीएमपीएल आगार प्रमुख भास्कर दहातोंडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव ,देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे ,एसआयटी च्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रेया उबाळे ,पोलीस उपनिरीक्षक अतुल वसेकर ,मंडल अधिकारी दीपक नरवडे ,तलाठी सूर्यकांत काळे, येलवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका पूनम शेवाळे,महावितरणचे अतिरिक्त अभियंता एस.एस.हंचाटे ,सहाय्यक अभियंता एस.बी.झोडगे ,नगरसेवक प्रवीण काळोखे,योगेश परंडवाल,प्रवीण काळोखे,योगेश काळोखे, मयूर शिवशरण, पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर, सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
*देहूनगर पंचायत ऍक्टिव्ह मुडवर*
देहूनगर पंचायतीच्या वतीने इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून मंदिर ,घाट व परिसर स्वच्छ करण्यासाठी २५ तर मुख्य मंदिर व मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.पथदिवे दुरुस्ती व साफसफाईचे काम चालू करण्यात आले आहे.पाण्याच्या टँकरची १२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून ११०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे.विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी दुय्यम फिडरची व्यवस्था करण्यात आली आहे.तिन्ही पाळीत कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.
*निवेदिता घार्गे*
*मिख्याधिकारी देहूनगर पंचायत*
*देहू संस्थानने केल्या या मागण्या*
गायरणा जमिनीवर शेकडो दिंड्या मुक्कामी असतात.त्यांना त्यांना विद्युत पुरवठा करण्यात यावा ,पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत,पावसाळ्याचे दिवस असल्याने दिंड्याच्या निवासाची सोय शाळेमध्ये करण्यात यावी.
*देहू देवस्थान संस्थांनची मागणी*
—————————————-
*अशी असेल आरोग्य सेवा*
बाह्यरुग्ण तपासणी व उपचार केंद्र -४ , रुग्णवाहिका -४ ,कार्डियक रुगबवाहिका-१ ,पुरेसा औषधांचा साठा,पाणी मिर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडीक्लोर आणि अतिरिक्त कर्मचारी आसनावर आहेत.उपहार गृह स्वीटहोम ,तसेच खाद्य पदार्थांच्या दुकानांची वारंवार तपासणी करण्यात येणार आहे.खाजगी रुग्णालयातील बेड आरक्षित करण्यात आले आहेत.
*डॉ.किशोर यादव*वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र देहू*