
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : दुष्काळ आणि महागाईने राज्यातील जनता होरपळून निघत आहे. अशावेळी महावितरण अवाच्या सव्वा बिले ग्राहकांना देत असल्याचा प्रकार समोर येत आहे. वाघोली येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबाला तब्बल एका महिन्याचे बिल तब्बल ३८७८० रुपये एवढे वीज बिल आले आहे.एक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरात हवेसाठी एक पंखा, उजेडासाठी दोन बल्ब, एक टीव्ही, आणि असेल तर एखादा फ्रिज एवढ्या गोष्टीवर जर एवढे वीज बिल येत असेल तर सामान्य नागरिकांनी जगायचं कस अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
वाघोली येथील श्री राम बाळासाहेब देशमुख हे राधेश्वरी सॊसायटी येथे राहात असून दर महिन्यात त्यांना १५०० ते १८०० इतके वीज बिल येत होते. परंतु अचानक आलेल्या या वीज बिलाने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. बर आता या वाढीव लागून आलेल्या बिलासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. चूक झालीय महावितरणकडून आणि हेलपाटे ग्राहकाला मारावे लागत असल्याने नागरिक तीव्र भावना व्यक्त करत आहेत. वाढीव वीज बिलाची तात्काळ दुरुस्ती करून नवीन बिल देण्यात यावे अशी मागणी या वेळेस करण्यात आली.
महावितरणने मनमानी कारभार तात्काळ थांबवून योग्य ती दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा. व सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड थांबवावी,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– शिवरत्न बादगुडे
– सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गट*