
जेजुरी प्रतिनिधी : दि 28 जुन पंचायत समिती पुरंदर येथे बांधकाम सेवक म्हणुन कार्यरत असणारे श्री . अंकुश (दादा) तुकाराम घाटे यांच्या 39 वर्ष 2 महिने 29 दिवसांच्या प्रदीर्घ सेवनंतर सेवा निवृत्त होत असलेने त्यांच्या सेवेचा सेवापूर्ती व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात जेजुरी येथे शुक्रवारी पार पडला.
अंकुश (दादा) तुकाराम घाटे मुळचे कोळविहिरे घाटेवाडीचे सामान्य शेतकरी कुटुंबातील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण 4 थी पर्यंत झालेले असले तरी शिक्षणाविषयी असलेली ओठ त्यांनी कधीही कमी होऊन दिली नाही त्यांनी त्यांच्या मुलामुलींना अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले आहे. त्यांची मुलगी एक उत्तम व्यवसायिक असुन मुलगा भुषण घाटे बेळगाव येथे कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत . भुषण घाटे यांना दोन महिन्यापूर्वी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंकुश (दादा) घाटे यांनी आपली सेवा बजावत असताना आपली स्वतःची शेती ही उत्तम प्रकारे करत आपली मातीशी नाळ कधीही तुटू दिली नाही.
या सेवापुर्ती सोहळ्याला माजी जिल्हा परिषदचे आदर्श सदस्य सुदामअप्पा इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष व माजी सभापती पंचायत समिती पुरंदर चे माणिकराव झेंडे, पंचायत समिती पुरंदर येथील अधिकारी वर्ग तसेच बांधकाम विभागातील सहकारी मित्र रामदास जगताप , नागेश्वर नाझिरकर , बाळासाहेब उबाळे, महादेव राणे, आत्माराम खैरे माजी सरपंच नाझरे , आबा जगताप , हरिभाऊ पवार, शशिकांत दाते सर तसेच त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे व त्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्या सोबत असणारा त्यांचा मित्रपरिवार व घरातील सर्व सदस्य हजर होते.
अंकुश ( दादा) घाटे यांच्या सेवानिवृत्ती व सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मित्रमंडळी, सहकारी,नातेवाईक यांनी त्यांच्या सोबत घडलेले अनेक आनंदी व मजेशीर सुख दुःखाचे किस्सेही सांगितल्यावर सर्वांना गहिवरून आले. आपण सेवेतून निवृत्त होत आहात जीवनातून नाही तुमचे उर्वरित आयुष्य अंकुश (दादा) आपण आता निसर्गाच्या सानिध्यात राहून पर्यटनाचा आनंद घेत जगावं व आपल्या हातुन जे सेवेत असताना राहुन गेलं आहे ते आपल्या कुटुंबासोबत व नातवंडं यांच्या सोबत देवदर्शन करून व्यथित करावे असे ही सांगितले. बांधकाम विभागातील सेवानिवृत्ती व सत्कार समारंभ कार्यक्रम अतिशय खेळीमेळीत पार पडला.
या कार्यक्रमाच्या सत्काराला उत्तर देताना अंकुश दादा घाटे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करत माझ्या सेवानिवृत्ती नंतरही असच माझ्या कुटुंबासोबत प्रेम व जिव्हाळा सदैव राहु द्या असे म्हणत सर्वांचे आभार मानले.