
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व पी एल शिरसाट यांची जयंती त्यांचे राहते घरी आनंद नगर अकोला येथे दि २जुलै रोजी साजरी करण्यात आली .
याप्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्षा श्रीमती चंदाताई शिरसाट यांनी पी एल शिरसाट यांच्या प्रतीमेचे पुजन करून हारार्पन केले व त्यांना अभिवादन केले . याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष पीएन बोळे; राज्य चिटणीस संजय वानखडे; वाशीम जिल्हा अध्यक्ष अशोकराव उपाध्ये यांनी सुद्धा पीएल शिरसाट साहेब यांच्या प्रतीमेचे भावपूर्ण पुजन करून त्यांना अभिवादन केले . याप्रसंगी पीएन बोळे सर यांनी पी.एल च्या आठवणी उजागर केल्यात . कार्यक्रमाचे संचलन अशोकराव उपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती चंदाताई शिरसाट यांनी केले .