
म्हसळा – (रायगड )प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा, – म्हसळा शहरातील मुख्य वाहतुकीचा माणगाव श्रीवर्धन राज्य मार्गावरील तालुका शहरातील ग्रामीण रूग्णालय ते पंचायत समिती इमारत पर्यंतचा अर्धा किलोमिटर अंतराचा रस्ता पुर्णतः नादुरुस्त झाला आहे.या रस्त्यापैकी न्यू इंग्लिश स्कूल पर्यंतचा काँक्रिटचे बांधकाम पुर्ण झाले असून अर्धेअधिक काम मागील एका वर्षा पासून अपूर्ण आहे.सदरचा रस्ता फारच अरुंद आहे त्यातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने पावसाचे दिवसांत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ? रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असल्याने पावसाचे दिवसांत प्रवास करताना या रस्त्यातून मार्ग कसा शोधायचा हा जिक्रिचा आणि गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच अवस्था झाली असल्याने केव्हाही अपघात घडू शकतो.जर का अपघात झाला तर त्याला सर्सस्वी सार्वजानिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल असा इशारा म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील यांनी दिला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व बांधकाम करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खासदार सुनिल तटकरे यांनी उपलब्ध करून दिला आहे.मधल्या काळात रस्ता बांधकाम करण्यास काही अडचणी आल्या ते समजु शकतो पण आता तशी परस्थिती नसताना बांधकाम विभाग सदरचा बांधकाम पूर्ण करण्यास विलंब करीत असल्याने आता निदर्शन करण्याची वेळ आली असल्याचेही महादेव पाटील यांनी पोटतिडकीने माहिती देताना सांगीतले.
म्हसळा शहरातील या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर राजिप पाणी पुरवठा विभाग कार्यालय,एस.टी.स्थानक,ग्रामीण रूग्णालय,तहसिलदार निवासस्थान,अंजुमन हायस्कूल,बँक ऑफ इंडिया,पोस्ट हॉपिस,स्टेट बँक, पंचायत समिती,तालुका कृषी कार्यालय,तालुका सार्वजनिक वाचनालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,आयडीयल स्कूल,महीला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,शासकीय निवासस्थान,न्यू इंग्लिश स्कूल,खाजगी दवाखाने,आदी शासकीय व निमशासकीय कार्यालय,हॉटेल व अन्य व्यवसायिकांची मालमत्ता व दुकान आहेत.याच मार्गावरून रोज तीन ते चार हजार विध्यार्थी,तालुक्यातुन बाजारहाट आणि शासकीय व आरोग्य सेवेसाठी आलेले नागरीक,शहरातील लोकवस्तीचे नागरीक लागुनच खारगावखुर्द,सकलप गावातील नागरिकांची मोठ्रया प्रमाणावर रहदारी असते.सदरचा रस्ता देखभाल दुरूस्ती करणे कामी सार्वजानिक बांधकाम विभाग उपअभियंता श्रीवर्धन यांचे अखत्यारीत आहे.रस्ता दुरुस्त करून मिळण्यासाठी सातत्याने अर्ज व विनंती करूनही बांधकाम विभाग लक्ष देत नाही.येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा माजी सभापती महादेव पाटील यांनी दिला आहे.