
दै.चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रिय , कुशल , संघटक मनमिळावू स्वभावाच्या सहशिक्षिका ज्योती सिरसाळकर ( गुंटूरकर ) यांच्या व तसेच दुसरे सहकारी समता ज्यू.काॅलेजचे प्रा. परमेश्वर रोकडे यांच्या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमात सह्रदयी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आहेररुपी सत्कार करून सेवापूर्ती गौरव समारंभमध्ये भावपूर्ण निरोप देण्यात आला.
समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रिय , कुशल संघटक , सर्वांशी आपुलकीने मनमिळावू स्वभावाच्या श्रीमती ज्येष्ठ सहशिक्षिका ज्योती मधुकरराव सिरसाळकर ( गुंटूरकर) यांची २९ वर्ष प्रदीर्घ सेवा केली .व दुसरे समता ज्यू.काॅलेजचे शांत , संयमी , कृतत्वान ,गाढे अभ्यासक प्रा.परमेश्वर बळीराम रोकडे यांची ३१ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सेवापूर्ती गौरव समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख , पुरूषोत्तमराव देशपांडे , ( अध्यक्ष ) , (कमलाकरराव देशपांडे ( उपाध्यक्ष ) , बालमुकुंदराव कुलकर्णी ( सचिव ) , तुकाराम वारकड गुरूजी ( सहसचिव ) , अनिरुद्ध शिरसाळकर ( संस्थेचे कोषाध्यक्ष ) , प्रदीपराव देशमुख ( संचालक ) अरुण देशपांडे ( आजीव सदस्य ) , योगेश वारकड ( आजीव सदस्य) , गोविंद बोदेमवाड ( मुख्याध्यापक) , राजीव आंबेकर ( पर्यवेक्षक ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमांची सुरूवात सरस्वती मातेच्या मुर्तीची पुजा व दीपप्रज्वलन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सौ. अमृता (देशमुख ) सिरसाळकर यांनी गित गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल सहशिक्षिका श्रीमती ज्योती सिरसाळकर गुंटूरकर व परिवार आणि प्रा. परमेश्वर रोकडे व सहपत्नीक यांचा संस्थेच्या वतीने सेवापूर्ती गौरव समारंभमध्ये आहेररूपी भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने , भिमाशंकर मा व उच्च माध्यमिक विद्यालय शिराढोण , जिल्हा परिषद के. प्रा. मुलांची व मुलींची शाळेतील शिक्षक वृंद , सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक राहुल सोनसळे सह शिक्षक वृंद , इष्ट मित्र परिवार , सगे , सोयरे , नातेवाईक यांच्या कडून शाल ,श्रीफळ, हार , साडी चोळी , कपडे ,आहेररूपी देऊन गौरविण्यात आले व शुभेच्छा दिल्या. त्यांनंतर प्रा. रोकडे बोलताना म्हणाले की , सेवानिवृत्ती म्हणजे सृजनवेद करण्यासाठी वेळच वेळ , मी भाग्य समजतो सेवानिवृत्त झाले म्हणजे शाळेचा व संस्थेचा संबंध संपला असे नाही , आपले ऋणानुबंध कायम राहील, . आपल्या कार्यकर्तृत्वाची गाथा प्रगट करताना समता शिक्षण प्रसारक मंडळ व जहागीरदार घरण्याशी नाळ जोडली आहे.त्यांच्या ऋणात कायम राहु अशी अंत: करणातुन भावना व्यक्त केल्या. त्यानंतर ज्योती सिरसाळकर गुंटूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की , माझ्या माहेरच्या शाळेत माझी सेवा करताना कुठलीच आडचण आली नाही. सर्व सहकारी शिक्षकांनी मला सांभाळून घेतलं .आज मी शाळेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल माझा सेवापूर्ती गौरव केला.मला माहेरची साडी म्हणून आदराने स्वीकारते असे म्हणून कंठ दाटून आले.
प्रा.कटकमवार , सौ. वर्षा देशमुख , वाघमारे ,ना.ना. लोंढे , तुकाराम वारकड गुरूजी , सुमित गुंटुरकर , सावते , यांच्या सह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना जहागीरदार गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. गौतमी कुलकर्णी यांनी केले.
सेवानिवृत्त ज्येष्ठ सहशिक्षिका श्रीमती ज्योती सिरसाळकर गुंटूरकर यांच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी यांचा विठ्ठल रखुमाई व शाल हार देऊन सत्कार करण्यात आला.