
दै. चालु वार्ता:रोहा प्रतिनिधी:अजय परदेशी
पनवेल (घोट) गावचे सुप्रसिद्ध उद्योजक व भाजपचे युवा नेते श्री विनोद शेठ पाटील यांनी मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सद्गुरु वामन बाबा माध्यमिक घोट विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना नवनीत मार्गदर्शिका पुस्तिका (गाईड) वाटप करण्यात आले स्वतः तळोजा परिसरात मोठे उद्योजक असून सुद्धा आपल्या मुलीचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत नवनीत मार्गदर्शिका पुस्तिका वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदेश पाटील सर, यांनी श्री विनोद शेठ पाटील यांचे आभार मानले यावेळी विद्यालय व्यवस्थापक समिती अध्यक्ष वैभव भोईर , विठ्ठल भाऊ वाव्हले, गिरीश पाटील, एकनाथ कोळी , नितीन पाटील , ज्ञानेश्वर पाटील , उपस्थितीत होते सूत्रसंचालन अंभोरे सर यांनी केले..