
दै,चालू वार्ता
निलंगा तालुका प्रतिनिधी इस्माईल महेबूब शेख.
लातूर /निलंगा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लातूर जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख संपताताई गडकरी यांच्या सूचनेनुसार जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे यांनी निलंगा शिवसेना महिला आघाडीची शहर कार्यकारिणी घोषित केले आहे.
निलंगा येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेना महिला आघाडीची बैठक बोलावून या बैठकीमध्ये शिवसेना वाढी संदर्भात चर्चा करण्यात आली व शिवसेना शहर महिला गाडीची कार्यकारणी जाहीर करण्याचे ठरले या कार्यकारिणीमध्ये शिवसेना उपशहर संघटिका म्हणून सौ पार्वती कमलाकर भिसे, रिहाना उस्मान सय्यद, पार्वती महादेव कांबळे, नागिन माधवराव सुरवसे, ज्वेहरा गफार बिबराळे, यांची निवड करण्यात आली आहे त्यांना शहराचे पाच भाग करून वेगवेगळ्या भागांची जबाबदारी देण्यात आली आहे जबाबदारी देत असताना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे यांनी शिवसेनेची ध्येयधोरणे सामाजिक बांधिलकी जोपासत घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवण्याच्या सूचना करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका पूजाताई सगर अरुणाताई माने मंगल ताई कांबळे नंदाताई गाडे लायकभाई शेख आदी उपस्थित होते.