
साऊथ अफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात संजू सॅमसनच्या 107 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये आठ गडी गमावून 202 धावा केल्या होत्या.
त्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 17.5 ओव्हरमध्ये केवळ 141 धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी फिरकीच्या जोरावर साऊथ अफ्रिकेचं कंबरडं मोडलं. मात्र, या सामन्यात राडा झाल्याचं दिसून आलं. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव यानेच लाईव्ह सामन्यात राडा केल्याचं पहायला मिळालं. सूर्या असं का वागला? पाहा
नेमकं काय झालं?
साऊथ अफ्रिकेच्या 7 विकेट्स पडल्या होत्या. साऊथ अफ्रिकेच्या डावाची 15 वी ओव्हर सुरू होती. त्यावेळी मैदानात जेराल्ड कोएत्झी आणि मार्को जॅनसेन खेळत होते. 15 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जेराल्ड कोएत्झीने मिड ऑफच्या दिशेने बॉल मारला अन् धाव घेतली. त्यावेळी संजू सॅमसनच्या दिशेने थ्रो आला. संजूने स्टंप्सच्या पुढे पीच लाईनवर जाऊन बॉल कलेक्ट केला. त्यावरून जॅनसेनला राग आला.
जॅनसेनने अंपायरकडे याची तक्रार केली. स्टंप्सच्या पुढे पीच लाईनवर विकेटकीपर कसा येऊ शकतो, असं जॅनसेनने अंपायरला सांगितलं. त्यावरून संजू आणि सूर्या भडकले. सूर्याने थेट जॅनसेनशी पंगा घेतला अन् त्याला समजवून सांगितलं. त्यावेळी अंपायरला दोघांच्या वादात मध्यस्थी करायला लागली. अंपायरने संजूला वॉर्निंग दिली अन् खेळ पुन्हा करण्यास सांगितलं.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर.