
आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबियांक़डून तीन जणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य यांचा मावस भाऊ वरूण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीत वरूण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरे आणि मी जिंकेन आणि तिसरी सीटही आमचीच येईल असा दावा केला आहे.
यामध्ये वरूण सरदेसाई यांनी मुंबईतील या तीन जागा जिंकण्याचा दावा केला आहे. यावेळी बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले ठाकरे कुटुबियांकडून आम्ही आदित्य ठाकरे, मी आणि अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे.यापैकी आदित्य ठाकरे जिंकतील, मी पण जिंकेन आणि तिसरे सीट ही आमचीच येईल, असा दावा वरूण सरदेसाई यांनी केला आहे. त्यामुळे वरूण सरदेसाई यांच्या विधानाने अमित ठाकरेंचा पराभव होण्याची अंदाज आहे.
खरं तर माहिम मतदार संघात ठाकरे गटाकडून महेश सावंत, शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. या ठाकरे-शिंदेच्या लढतीत तिसरी सीट म्हणून महेश सावंत विजयी ठरतील असा वरूण सरदेसाई यांचा दावा आहे.
तसेच वरूण सरदेसाई वांद्रे पुर्वेतून विधानसभा लढवणार आहे.त्याच्याविरूद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे झीशान सिद्दीकी मैदानात आहे. या लढतीवर बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले की, मी पहिल्यांदाच निवडणूक लढतो आहे. पण राजकारणात मी खुप वर्षापासून आहे. मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. महाविकास आघाडीचा नेता या मतदार संघातून जिंकावा,अशा त्यांच्या भावना आहेत, असा विश्वास वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला होता.
झीशान सिद्दीकी यांनी पाच काहीच काम केलं नाही. कोणताच प्रकल्प पुढे नेला नाही. या भागात खुप झोपडपट्टया आहेत, यामध्ये हजारो लोकं राहतात.त्यांनी काहीच विकास केला नाही आहे. त्यामुळे आता लोकांनी ठवरलं कुणाला मतदान करायचं आहे, असे वरूण सरदेसाई यांनी सांगितले.