
दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतेय. आज शनिवारी 09 नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव जवळपास स्थिर राहिले आहेत. शुक्रवारी सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण झाली होती.
सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात होणारी घसरण लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणा-यासाठी एक चांगली संधी आहे.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,500 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलयचं झालं तर त्याची किंमत 72 हजार रुपयांच्या पुढे आहे. चांदीच्या दरातही घसरण होत आहे. चांदी 92 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई – आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे – आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे – आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर – आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक – आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,278 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,939 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव – आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर– आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,275 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,936 रुपये प्रति ग्रॅम आहे.