
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
खेड तालुक्यातील बाबाजी काळे यांच्या प्रचारात संपूर्ण गावे सहभागी
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
राजगुरुनगर
महाविकास आघाडीतीलराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडी
शिवसेना मशाल
पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांनी कान्हेवाडी सांगुर्डी येलवाडी खालुंब्रे, परिसरातून काढलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच खेड आळंदी मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ता बदल हवा, अशा भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. श्रीक्षेत्र येलवाडी येथील भैरवनाथ मंदिर संत भागीरथी मातेचा मंदिरात नारळ फोडून पदयात्रेला सुरुवात झाली.
या वेळी सर्व ग्रामस्थ तसेच खेड शिवसेना तालुकाप्रमुख रामदास धनवटे जिवन बोत्रे सर्व शिवसेना पक्ष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येलवाडी परिसरासह रोकडोबा विठ्ठल भागीरथी मंदिर जाऊन सर्व ग्रामस्थ सह आशीर्वाद घेऊन येलवाडी कमानी पासुन मंदिर परिसरात पदयात्रा झाली.
नागरिकांनी विविध समस्यांचे गाऱ्हाणे बाबाजी काळे यांच्या समोर मांडले. आम्हाला आता खेड तालुक्याच्या बदल हवा असून सुसंस्कृत, सुशिक्षित, अभ्यासू आणि आमचे प्रश्न कायमचे सोडविणारा आमदार हवा असल्याची भावना नागरिकांनी त्यांच्याजवळ व्यक्त केली.
छोट्या मोठ्या संघटनांचा पाठिंबा
बाबा काळे यांना दररोज छोट्या मोठ्या संघटनाचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, व्यापारी तरुण युवा मंडळी वयोवृद्ध सर्व कर्मचारी पदाधिकाऱ्यांना बाबाजी काळे यांची भेट घेतली. या वेळी खेड तालुका शिवसेना प्रमुख रामदास धनवटे व तसेच महीला वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते
……..
प्रश्न सोडविल्याच्या केवळ भाकड कथा खेड आळंदी मतदार संघातील गेले अनेक वर्ष ऐकत आहे. खेड मतदारसंघात असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. आळंदीत दहा वर्ष पाणी मिळालं नाही. रस्ते नाहीयेत. कचराप्रश्न आहे. निवडणुकीत पुन्हा फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. मला संधी मिळाल्यावर पाणी, रस्ते आणि इतर प्रश्रातून खेड तालुक्यातील कायमची मुक्तता करण्याचा माझा संकल्प आहे.
बाबाजी काळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडी