
दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : टाटा प्रवेश या नव्या अत्याधुनिक दालनाचे उद्घाटन शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, गोविंदराव केंद्रे, विठ्ठलराव माकणे,रमेशअण्णा अंबरखाने,बसवराज पाटील कौळखेडकर,चंदरअण्णा वैजापूरे, चंदरअण्णा पाटील, धनंजय गूडसूरकर, राजकुमार भोसले, शेषेराव सुडे, विजय निटूरे, सतीश उस्तूरे, अनिल मूदाळे, राजकुमार हूडगे, प्रमोद पदातूरे, विशाल जैन उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. रतन टाटा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अविनाश हेरकर, गणपतराव हेरकर, सिद्राम हेरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. टाटांचे विशाल लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.
बसवराज पाटील नागराळकर यांनी या अत्याधुनिक शोरूममुळे उदगीरला नवी सोय झाल्याचे म्हणाले व हेरकर कुटूंबीय हे विश्वासाचे प्रतिक असून ते पूढेही चांगली सेवा देतील असा विश्वास व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनी या माध्यमातून उदगीरमध्ये ही सेवा देत असल्याबद्दल अविनाश हेरकर यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना ना.संजय बनसोडे यांनी टाटा म्हणजे गुणवत्ता हे समीकरण असून उदगीरच्या वैभवात यामुळे भर पडेल असे प्रतिपादन केले. महेश मळगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.