
शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारण्याची धमकी दिली आहे. यावर अजित पवार यांनी बारामती शहरातील बालकमंदिर या ठिकाणच्या निवडणूक केंद्राला भेट देऊन प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ते निवडणूक अधिकारी तपासतील. अशा पद्धतीचं आमच्या कार्यकर्त्यांनी कधी वक्तव्य केलेले नाही. आम्ही सुसंस्कृत फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असून माझा आमच्या कार्यकर्त्यांवर पूर्ण ठाम विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं आहे..
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील काय खरे आहे काय खोटे आहे ते पाहतील. तक्रार कोणीही करेल मात्र त्यात त्या असेल तर कारवाई होईल उलट माझ्याच कार्यकर्त्याला बॉलिंग एजंटला मतदान केंद्रातून बाहेर काढले हा अधिकार त्यांना नसून तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आहे.
मतदानात करते वेळी स्लीपवर चिन्ह दिलेले असते ते फाडून स्लिप आतमध्ये घेऊन जावे लागते. हे सर्वांना माहित आहे. एक वाजून गेल्या तरी मतदानाच्या आकडेवारी कमी आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता जो योग्य उमेदवार वाटले त्याला मतदान करा, असे आवाहनही अजित पवार यांनी केलेय.