
विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटप केले नाही. त्यांच्याकडे कोणतेही पैसे नव्हते. सगळं नियोजन करून हल्ला करण्यात आला आहे’ असं म्हणत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासचिव विनोद तावडे यांची भक्कमपणे पाठराखण केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांनी खळबळ माजली. विनोद तावडे थांबलेल्या हॉटेलमध्येच बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतिज ठाकूर आणि त्यांच्य कार्यकर्त्यांनी धाड टाकली. या हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकाराचं खंडन केलं आहे.
“विनोद तावडे हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे कुठलाही पैसा सापडला नाही. त्यांच्याकडे कोणत्याही वादग्रस्त गोष्टी सापडल्या नाही. उलट त्यांच्यावरच हल्ला झाला. आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार आहे राजन नाईक यांच्यावरच हल्ला झाला आहे. एकूणच ही जी काही इको सिस्टिम आहे. त्या सिस्टिमने उद्याचा पराभव दिसत आहे, तो कव्हर करण्यासाठी फायरिंग केलं आहे. विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटप केले नाही. त्यांच्याकडे कोणतेही पैसे नव्हते. सगळं नियोजन करून हल्ला करण्यात आला आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख यांनी सिनेमाची स्क्रिप्ट रचली
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “असं आहे की, अनिल देशमुख यांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी सिनेमात सलील-जावेद यांच्या कथेवर सिनेमे गाजलेले आहे. तशी सलील जावेद यांची स्टोरी त्यांनी दाखवली आहे. मला वाटतं पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सगळं चित्र सांगितलं आहे’ असं फडणवीस म्हणाले.
तसंच, “आता प्रश्न असा निर्माण झाला आहे, १० किलोचा दगड जर कुणी फेकून मारला तर कारची काच का फुटली नाही. आता मागची काच फुटली आहे. जर मागून मारला असेल तर तो पाठीमागून व्यक्तीला लागला पाहिजे. पण इथं तर देशमुखांना समोरून लागला आहे. त्यामुळे असा दगड फेकण्याचा प्रकार हा रजनीकांत यांच्या सिनेमात घडत असतो. दगड फेकला आणि तो गोल फिरून डोक्याला लागला. मग नुसती जखम का दिसत आहे. याचं बिग पिक्चर समोर आलं आहे. हा सगळा सिनेमा तयार केला आहे. आपण आपला मुलगा हरत आहे. त्यातून हा प्रकार तयार करण्यात आला आहे. अशा प्रकाराला शरद पवार यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी इको सिस्टिम उभी करून दिली आहे.” असा टोलाही फडणवीसांनी लगावला