
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहे. अशातच वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांना मारहण झाल्याची घटना घडली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी नितेश कराळे यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वर्ध्याच्या उमरी इथं शरद पवार गट आणि भाजपा कार्यकर्त्यांत राडा झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली.
बाचाबाचीचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले आहे. उमरीचे ग्रामस्थ आणि नितेश कराळे यांच्यात हाणामारी झाली. काँग्रेस आणि भाजपाचे दोन्ही गट आमने सामने आल्याने वातावरण तापले आहे. सावंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. बूथवर कशाला आला, या कारणावरून वाद झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
नितेश कराळे यांनी शरद पवार गटासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत आहे. एवढंच नाहीतर लोकसभा निवडणुकीसाठीही कराळे मास्तर यांनी शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, त्यावेळी तिकीट दिले गेले नाही. पण शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी कराळे मास्तर यांनी प्रचार केला होता. कराळे मास्तर यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिक्षण आणि इतर सामाजिक मुद्यांवर नेहमी व्हिडीओ बनवत असतात. खास विदर्भाच्या शैलीतील भाषेमुळे कराळे मास्तर तरुणामध्ये लोकप्रिय आहे.