
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19व्या G-20 शिखर परिषदेेला हजेरी लावली. G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, इटली, इंडोनेशिया, नॉर्वे, पोर्तुगाल, इजिप्त, दक्षिण कोरिया आणि इतर देशांच्या नेत्यांची भेट घेतली.
नरेंद्र मोदी यांनी आयएमएफच्या गीता गोपीनाथ आणि युरोपियन युनियनच्या उर्सुला वॉन डेर लेयन यांचीही भेट घेतली. याबाबत पाकिस्तानचे राजकीय समालोचक कमर चीमा यांनी नरेंद्र मोदी यांच्या जागतिक नेत्यांसोबतच्या त्यांच्या भेटीगाठींबाबत कौतुक केले. एकीकडे चीमा यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारला कोंडीत पकडले.
कमर चीमा यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले की, ‘ब्राझीलची जी-20 शिखर परिषद नरेंद्र मोदी यांचं जगात काय स्थान आहे हे दिसून येत आहे. G-20 च्या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे स्थान दिले होते. मोदींच्या एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तर दुसऱ्या बाजूला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष होते. मोदींनी यावेळी इटली आणि इतर देशांच्या नेत्यांचीही भेट घेतली. यावरून भारताला जगात स्थान प्राप्त झालंय हे दिसून येतंय. भारतासोबत आम्ही (पाकिस्तान)ही स्वातंत्र्य मिळवले पण आज आम्ही कुठे आहोत हे आम्हाला ही माहित नाही. आज जगात आपण कुठेच दिसत नाही.’
नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना कमर चीमा म्हणाले की, ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका, ब्राझील, इटलीच्या नेत्यांना भेटत आहेत जणू ते ब्राझीलमध्ये एखाद्या गुजराती भाषिक व्यक्तीला भेटले आहेत आणि तिथं धमाल सुरू आहे. नरेंद्र मोदींनी आपले पत्ते अतिशय सुंदरपणे खेळले आहेत आणि संपूर्ण नियोजन करून जगासमोर ते सादर केले आहे, असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदींनी आपले पत्ते चमकदारपणे खेळले आणि त्याचा परिणाम म्हणजे नरेंद्र मोदी आणि भारताला जगात एक मोठे स्थान मिळत आहे.
पाकिस्तानच्या स्थितीबद्दल चीमा पुढे म्हणाले की, भारत किंवा जगाच्या तुलनेत आपण कुठे मागे आहोत यावर चर्चा व्हायला हवी. चीमा म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये कधीच टॅलेंटची कमतरता नव्हती पण आम्हाला ते समजले नाही. आम्ही राज्यघटनेला महत्त्व दिले नाही, जनादेश पुन्हा पुन्हा चोरला, उच्चभ्रूंना सर्व काही काबीज करू दिले आणि परराष्ट्र धोरण कधीच स्पष्ट केले नाही. दुसरीकडे, भारताने स्वातंत्र्यापासूनच परराष्ट्र धोरण ठरवले आहे आणि त्यावर पुढे जाणे पसंत केले आहे. जनतेच्या मताला आणि जनादेशाला महत्त्व दिले आणि जनतेचा आदर केला. याचाच परिणाम म्हणजे आज भारत एक चांगले ठिकाण बनले आहे.