
खंडणी हत्या आणि ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरार असलेल्या सर्व बँक खाती गोठवली आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी आणि नातेवाईकांचे सर्व खाते गोठवले आहेत. आज दिवसभरात 25 जणांची चौकशी होणार असून मोबाईल रिकव्हर डाटा फॉरेन्सिक रिपोर्ट पाच दिवस येण्याची शक्यता आहे.
वाल्मिकचे आणखी कोणत्या कोणत्या बँकेत खाती आहेत त्याचा शोध सुरू आहे. पॅन कार्ड लिंक असलेली सर्व संपत्ती संदर्भातील माहिती जमा करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून जमिनीची सर्व माहिती मागितली आहे. फरार आरोपी संबंधित बँकेची खाती गोठवल्याने पैसे काढू शकत नाही. आरोपी संदर्भातील जुने नाते, नवे नाते याचा शोध घेऊन चौकशीसाठी बोलवण्यात येत आहेत. आज 25 जणांचे सीआयडीकडून जवाब नोंदवले आहेत. आत्तापर्यंत दीडशे लोकांची चौकशी सुरू आहे.
मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आज फरार आरोपींचे बँकेचे खाते गोठवण्यात आले आहे. देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची झाल्याची माहिती आहे. गाडीत फरार आरोपींचे मोबाईल देखील सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी पथकाने संबंधित मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत. फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील सीआयडी कडून दाखल करण्यात आली आहे.
अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज नाही
या प्रकरणातील फरार आरोपींपैकी अद्याप कोणीही अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केलेला नाही . आरोपींपैकी फक्त एका आरोपीकडे पासपोर्ट तोही आरोपी अटकेत असल्याने इतर आरोपी परदेशी जाण्याचा अधिकृत मार्ग बंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेले आरोपी वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना पासपोर्टच नसल्याची देखील माहिती आहे.