
संजय राऊतांनी सर्वच सांगितलं,सुरेश धसांवरही वक्तव्य
संतोष देशमुख यांच्या हत्येचे खरे आरोपी अद्याप बाहेरच आहे, त्यामुळे संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला हवा. दुसरीकडे अजित पवार हे महाराष्ट्राची अस्मिता अस्मिता करतात पण जर ते महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणात जोपर्यंत त्यांना न्यायलय निर्दोष मानत नाही आपल्या नेत्याला (धनंजय मुंडे) मंत्रिमंडळातून वगळले असते.
संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे नेते नाहीत, ते अपघाती नेते झालेले आहेत. ते हतबल आहेत. त्यांना इव्हीएमच्या कृपेने जागा मिळाल्या आहेत. जर ते महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणात जोपर्यंत त्यांना न्यायलय निर्दोष मानत नाही आपल्या नेत्याला (धनंजय मुंडे) मंत्रिमंडळातून वगळले असते.
संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला हवा
संजय राऊत म्हणाले, बीड पॅटर्न कशाप्रकारे महाराष्ट्रात सुरु होता आणि अजूनही चाललेला आहे, ही धुळफेक सुरु आहे, अजूनही वाचवण्याचेच प्रकार सुरु आहे. त्यांना वाचवले जातील आणि खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. सुरेश धस हिमतीने उभे राहीले असते तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि बीड पॅटर्नमुळे जो कलंक लागला आहे तो धुण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर एक मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवायला हवी. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
सरकार फसवत आहेत
संजय राऊत म्हणाले, सरकारकडून फसवणूक सुरु आहे. लाडकी बहिण असो की, कर्जमाफी यासंदर्भात महायुती सरकारचा जाहीनामा बघावा, कर्जमाफीची वचने आहेत, कृषिमंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही. तुम्ही लोकांना फसवत आहात असा याचा अर्थ आहे.
रत्नागिरीची बंद , गोरकपूर रेल्वे सुरु केली
संजय राऊत म्हणाले, दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते आणि दादर – गोरखपूर रेल्वे सुरु होते. भाजप आणि डुब्लिकेट शिवसेनेचे हे काम आहे. असे होत असेल तर महाराष्ट्राची अस्मिता अस्मिता करणारे अजित पवार काय करत आहेत.