
संजय राऊतांचं मोठं विधान, निवडणूक आयोगावरही केली बोचरी टीका
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील खासदारांना संपर्क साधून आपल्याकडे वळविण्याच्या बातमी काही वेळापूर्वीच आली. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांन उधान आले आहे.
यावर आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत, तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही. हे मंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे, असा दावा करीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद हवं असल्याचे ते म्हणाले. तसेच राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर बोचरी टीका केली आहे. निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचे मांजर झाले असल्याचे राऊत म्हणाले.
देशाला त्याचा काहीही उपयोग नाही
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेलं आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल. देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरु असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं
तसेच ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा तुम्ही जिंकला आहात तरीही तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडाफोडी सुरु आहे. देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं आहे, अशा शिलक्या शब्दांत त्यांनी टीका केली.