
तुमचं व्हॉट्सअॅप धोक्यात; कुणीही वाचू शकतं चॅटिंग, नेमकं प्रकरण वाचा
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्समध्ये एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. Meta चे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्सअॅप चॅट्सच्या सुरक्षिततेविषयी दिलेल्या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
झुकरबर्ग यांनी सांगितले की, अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा, जसे की CIA, वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर प्रवेश मिळवल्यास व्हॉट्सअॅप चॅट्स वाचू शकतात.
व्हॉट्सअॅपची गोपनीयता धोरणावर प्रश्नचिन्ह
WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे, ज्याचे २९५ कोटींहून अधिक दैनिक सक्रिय युजर्स आहेत. हे अॅप मुख्यतः end-to-end encryption मुळे ओळखले जाते, जे मेसेजेस केवळ पाठवणाऱ्या आणि मिळवणाऱ्या व्यक्तींनाच वाचता येईल याची खात्री देते. मात्र, झुकरबर्ग यांच्या ११ जानेवारी २०२५ रोजीच्या वक्तव्यामुळे ही सुरक्षितता कितपत टिकेल, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
CIA आणि NSA यांच्यावर गंभीर आरोप
झुकरबर्ग यांनी एका पॉडकास्ट (The Joe Rogan Experience) मध्ये बोलताना सांगितले की, जर गुप्तचर यंत्रणांना डिव्हाइसवर फिजिकल ऍक्सेस मिळाला, तर त्या WhatsApp चॅट्स वाचू शकतात. पत्रकार टकर कार्लसन यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था NSA आणि CIA यांच्यावर खासगी मेसेज इंटरसेप्ट केल्याचा आरोप केल्यानंतर ही चर्चा झाली.
स्पायवेअरच्या धोरणाबाबत इशारा
झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले की, जर डिव्हाइसवर Pegasus सारखे स्पायवेअर इन्स्टॉल केले गेले असेल, तर एजन्सीज डिव्हाइसवरील सर्व डेटा वाचू शकतात. यामुळे व्हॉट्सअॅपने अलीकडेच गोपनीयतेसाठी Disappearing Messages सारख्या फीचर्स सादर केल्या आहेत. या फीचरद्वारे, ठराविक वेळेनंतर चॅट आपोआप डिलीट होते.
WhatsApp चे नवीन अपडेट
व्हॉट्सअॅपने याच पार्श्वभूमीवर युजर्ससाठी नवीन अपडेट जारी केले आहे. आता युजर्स पोल तयार करताना फोटो जोडण्याचा पर्याय मिळेल. यामुळे पोल अधिक स्पष्ट आणि परिणामकारक होईल. उदाहरणार्थ, कार्यक्रम नियोजन करताना ठिकाणांच्या फोटोंसह पर्याय देऊन सहभागींचे मत जाणून घेणे अधिक सोपे होईल.
गोपनीयतेसाठी उपाय गरजेचे
व्हॉट्सअॅपच्या चॅट्सवर गुप्तचर यंत्रणांच्या हस्तक्षेपाची शक्यता लक्षात घेता, युजर्सनी त्यांच्या डेटा सुरक्षिततेसाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. झुकरबर्ग यांनी दिलेले हे वक्तव्य, WhatsApp युजर्ससाठी मोठी चिंता निर्माण करणारे ठरले आहे.