
पौष पूर्णिमा आणि मकर संक्रातीच्या शाही स्नानानंतर प्रयागराज मध्ये सुरु असलेला महाकुंभमेळा आणखी एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होणार आहे. पण त्या पूर्वीच उत्तरप्रदेशचे सर्वेसर्वा, ‘बुलडोजरबाबा’ मुख्यमंत्री योगीआदित्यानाथ यांना राज्यात दहशतवाद्यांनी मोठ आव्हान दिलं आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी सिलेंडरच्या स्फोट होऊन आग लागली होती. ही आग अपघात नसून दहशतवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट असल्याचे आढळले आहे. हा स्फोट आम्ही घडवून आणला, असे खलिस्तानी दहशतवाद्यांनी सांगितले आहे.
कडेकोट बंदोबस्त असलेल्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु असताताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर आता विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरवात केली आहे.
रविवारी झालेला सिलेंडर स्फोट हा खालिस्तानी जिंदाबाद या दहशतवादी संघटनेने घडवून आणल्याची बातमी साम टिव्हीने दिली आहे. या संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
आज योगी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराज येथे होत आहे. बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजूरी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 2019 मध्ये याच प्रयागराजमधील कुंभमेळ्यात योगी सरकारची बैठक झाली होती.
आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश कुमार पाठक यांच्यासह अनेक मंत्री काल (मंगळवार) प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराज येथे येत आहे.
योगी सरकारचे कॅबिनेट, राज्यमंत्री, स्वतंत्र कारभार असलेल्या मंत्र्यांना आजच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक अरैल येथील त्रिवेणी संकुल येथे दुपारी होत आहे. प्रयागराज येथील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अरैल येथे घेण्यात येत आहे.
बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वमंत्री अरैल येथील व्हीआयपी घाटावरुन मोटर बोटने संगमावर स्नान करण्यासाठी जाणार आहेत. गंगा स्नानानंतर सीएम योगी यांच्यासह सर्वमंत्री पूजा करणार आहेत. स्नानासाठी अनेक आमदार, खासदार सहभागी होणार आहेत.