चित्रपटासाठी घरं गहाण, फ्लॉप सिनेमामुळे मोठं नुकसान
खासदार अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करु शकला आहे. इमर्जन्सी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा वादात सापडला होता.
वादात सापडल्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री लागल्यानंतर हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण याकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ वळवली. कंगना रणौतने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. इमर्जन्सी चित्रपट कंगनासाठी एखाद्या ड्रीम प्रोजेक्टप्रमाणे होता. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला आणि तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं.
‘इमर्जन्सी’च्या अपयशामुळे कंगनावर घर सोडण्याची वेळ?
इमर्जन्सी चित्रपट आणीबाणीच्या कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटासाठी कंगनाने खूप पैसा लावला होता. हा एक बिग बजेट चित्रपट होता. पण, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुरती माती खाल्ली आणि हाती काहीच आलं नाही. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली, या चित्रपटामुळे कंगनाला खूप मोठं नुकसान झालं आहे. कंगनाने या चित्रपटासाठी तिचं आलिशान घरही गहाण ठेवलं होतं, त्यामुळे आता नुकसान झाल्याने कंगनाला घराबाहेर पडण्याची वेळ तर नाही येणार ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
इमर्जन्सी चित्रपट फ्लॉप ठरल्याने मोठं नुकसान
कंगना रणौतचा इमर्जन्सी चित्रपट आधी सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडला, त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. कंगनाने या चित्रपटासाठी सर्व ताकद झोकून दिली होती. पण, कंगनाने जितकी तयारी केली होती, तितका हा चित्रपट चालला नाही. या चित्रपटावे तिची पुरती निराशा केली. चित्रपट थिएटरमध्ये कधी आला आणि कधी गेला काही कळलंच नाही. मोठी स्टारकास्टही या चित्रपटाला वाचवू शकली नाही, चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे कंगनाचं खूप नुकसान झालं आहे.
बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये आहे. चित्रपट बनवण्यासाठीही बराच वेळ लागला. गेल्या 3-4 वर्षांपासून हा चित्रपट चर्चेत होता. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सरासरी सुरुवात झाली. हा चित्रपट हळूहळू तोंडी काहीतरी चमत्कार करेल अशी आशा होती. पण असं काहीही झालं नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.5 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 3.6 कोटी रुपये कमावले. रविवारीही चित्रपटाने चांगला कलेक्शन केला आणि 4.25 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने सुमारे 20 कोटी रुपये कमावले आहेत. यावरून बजेट काढण्यातही पूर्णपणे अपयशी ठरल्याने चित्रपट फ्लॉप ठरला.
कंगनाचं सर्वस्व पणाला
या चित्रपटासह कंगना रणौतच्या फ्लॉप चित्रपटांची मालिका कायम आहे. गेल्या काही काळापासून कंगनाच्या चित्रपटांना खास कामगिरी करता आलेली नाही. तिचे चित्रपट खास कमाई करू शकलेले नाहीत. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण या चित्रपटानेही त्याला निराश केलं. हा चित्रपट बनवण्यासाठी तिने स्वतःचं घरही गहाण ठेवलं होतं. पण हे देखील या चित्रपटाला हिट बनवण्यात मदत करू शकलं नाही.


