
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, मी सुद्धा एका सेकंदात…
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी विरोधक आणि काही सत्ताधारी नेते हे जोरदार मागणी करत आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच एका मंत्र्याने धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा..
असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
शिवसेनेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मद्यामाशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता असं विधान केलं आहे. पाहा प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले.
‘धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा…’
प्रश्न: अंजली दमानियांनी आरोप केला की, कृषी साहित्य हे अधिक किंमतीत धनंजय मुंडेंनी खरेदी केल्या होत्या ते कृषी मंत्री असताना. याची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती. यावरून एकनाथ शिंदेंबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो.
प्रताप सरनाईक: मी सुद्धा मंत्री आहे आणि एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शेवटी जबाबदारी तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टाकून चालणार नाही ना. तुम्ही पालकमंत्री आहात. पालकमंत्री हा सर्वस्वी असतो जिल्हाचा. तुम्हाला जर एखादी वस्तू विक.च घ्यायची असेल, निविदा प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची अनुमती घ्यायची गरज नाही. शेवटी पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी तुमचीच आहे. त्यामुळे याच्या-त्याच्यावर ढकलून चालणार नाही.
पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, सार्वभौम हा मुख्यमंत्री असतो. पण मुख्यमंत्री बघायला येत नाही की, प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री काय-काय किंमतीमध्ये आणि काय-काय दरामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी घेतो.
ठीकए.. अंजली दमानियांनी काही आरोप केले असतील तर त्या आरोपांना उत्तर द्यायला धनंजय मुंडेसुद्धा सक्षम आहेत आणि शिंदे साहेब सुद्धा सक्षम आहेत. परंतु आरोपांची शाहनिशा होणं देखील गरजेचं आहे.
प्रश्न: नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा?
प्रताप सरनाईक: नैतिकता आणि लोकाग्रहास्तव या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. नैतिकतेला धरून राजीनामा देणं हे 100 टक्के तेवढंच खरं आहे. द्यायला हवा राजीनामा.. माझ्यावर देखील असे काही आरोप झाले तर मी दुसऱ्या सेकंदाला राजीनामा देईन. पण लोकाग्रहास्तव जर राजीनामा देण्याची कोणाची भूमिका असेल.. जर की, मोर्चे निघाले, आंदोलनं झाली किंवा आरोप झाले.. कुठलेही पुरावे नसताना तर तो राजीनामा देणं योग्य नाही असं मला वाटतं.
पण नैतिकतेवर राजीनामा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. तो मंत्री असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या. त्याने राजीनामा द्यायलाच हवा.
माझं असं मत आहे की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात संभाषणं, चित्रफित किंवा पुरावे हे या केसमध्ये कोणीही सिद्ध करावं. आणि हे सिद्ध केल्यानंतर जर राजीनामा नाही दिला तर ती गोष्ट वेगळी आहे.