
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत ते त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत. यासाठी ते काही वेळापूर्वीच प्रयागराज एअरपोर्टवर दाखल झाले आणि प्रयागराजच्या दिशेने रवाना झाला.
ते अरैल घाटवर दाखल झाले असून याठिकाणी ते जवळपास अर्धा तास स्नान पूजन करणार आहेत. पीएम मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित आहेत.
पीएम मोदींचा गंगा स्नान कार्यक्रम सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत असणार आहे. याआधी पीएम मोदी १३ डिसेंबर २०२४ रोजी प्रयागराजच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी ५,५०० कोटी रुपयांच्या १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. महाकुंभ सुरू झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिलाच प्रयागराज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एटीएस आणि एनएसजीसह इतर सुरक्षा पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. संगम परिसरात निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.