मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यामध्ये कोणतेही शीतयुद्ध सुरू नाही,असा निर्वाळा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिला.
या शीतयुद्धाची चर्चा ही केवळ माध्यमांतच सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.” शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचा आढावा घेण्यासाठी आम्ही समन्वय कक्ष स्थापन केला आहे. कामांना गती देण्याचे काम हे कक्ष करीत असते.
त्यामुळे कुठेही कामाची वा यंत्रणेची पुनरावृत्ती झालेली नाही. या बातम्या माध्यमेच चालवितात,असे शिंदे म्हणाले. आपल्याला आलेल्या धमकीविषयी पोलिस आयुक्तांनी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या सहआयुक्तांनी दूरध्वनीवर सांगितले आहे. अशा धमक्या आपल्याला अनेकवेळा आल्या आहेत. पण त्याचा विचार मी कधी केला नाही. मी माझे काम करतो,असे शिंदे म्हणाले.
