
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर)
नांदेड येथील कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपण नुसते बॅकिंग व्यवहार न करता समाजाला काही देणे लागतो ते ॠण फेडण्यासाठी या भावनेतून व्हिपीके पतसंस्था सामाजिक बांधिलकी जोपासत अग्रेसर जिल्हा काम करते तेच कार्य करत नांदेड शहरातील किशोर वयीन मुले मूलींना आपल्या आई वडील यांच्या नात्यातील संबंध काय असते आपल्या लेकरांना घडविण्यासाठी किती पराकाष्ठा करतो तरीही लेकरांना आईवडीलाचे महत्त्व कळत नाही तर एकीकडे ज्या लेकरांना आई आहे वडील नाहीत त्याला अडचणीवेळी वडीलांची महत्त्व कळते तेव्हा आठवण येते असे सुंदर व्याख्यान सांगणारे प्रभावे प्रसिद्ध व्याख्याते मा.श्री.वसंत हंकारे प्रथमच नांदेड शहरात येत असून त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून आई- बाप समजून घेताना हा विषयावर सखोल मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी जीवन घडविण्यासाठी सखोल माहिती नवा मोंढा मैदान येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर येथे दि.२० मार्च रोजी गुरूवारी सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत देण्यात येणार आहे .ज्यानां आई बाप असतात त्या लेकरांना या दोघांचे म्हत्व कळेना ज्यांना आई किंवा बाप नसल्याने काय परिस्थिती उदभवते हे जाणून घेण्यासाठी त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना व मुलींना उज्ज्वल भविष्य करिता हे व्याख्यानातून माहिती देण्यात येणार आहे त्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असे विनंती कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी आहवान केले आहे.