
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्यास आजपासून सुरवात झाली आहे, वारकऱ्यांसह लाखो भाविक शहरात दाखल झाले असुन भानुदास एकनाथांच्या
गजरात नाथनगरी दुमदुमून गेली आहे. महाराष्ट्रात पंढरपूर नंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणाऱ्या नाथांच्या नाथनगरीत यंदाचा नाथषष्ठी सोहळा साजरा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांसह लाखो भाविक पैठणमध्ये दाखल होताना दिसत आहे. तर या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या अंदाजे सहाशेच्यावर दिंड्या गुरुवार रोजी दाखल झाल्या होत्या. या सोहळ्यासाठी पैठणमध्ये 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.