
मुंबई: शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री पाटील यांनी सांगितले आहे की, या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. फहिम जहांगीर सय्यद यांना २५ लाख इतका घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले होता. डॉक्टर सय्यद या सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने शासन नियमानुसार त्यांच्या घरबांधणी अग्रीमावरील व्याजाची रुपये ८ लाख ४९ हजार २३ रुपये इतकी रक्कम क्षमापित करण्यात मान्यता देण्यात आली.
तसेच त्यांना मंजूर करण्यात आलेल्या आक्रम पैकी शिल्लक मुद्दल ९ लाख ६ हजार २५० रुपये त्यांना ते असलेल्या मृत्यु-नि-सेवा उत्पादनातून वसूल करण्यात आले. मात्र, या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांनी डॉ. सय्यद यांच्या मुद्दल व व्याजाची रक्कम असे १७ लाख ५५ हजार २७३ इतकी रक्कम त्यांच्या वारसाकडून धनादेशद्वारे मागणे हे नियमबाह्य आहे. याबाबत डॉ. सय्यद यांच्या वारसांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार, कॉलेज प्रशासनाने हे पैसे डॉ. सय्यद यांच्या वारसांना परत करणे आवश्यक आहे. डॉ. सय्यद यांच्या वारसा वसूल करण्यात आलेली रक्कम प्रकरणासंदर्भात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.
तसेच महाविद्यालयाच्या ताब्यात असणारी जागे संदर्भातही आपण स्वतः लक्ष घालून हा विषय मार्गी लावला जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.