दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा)
शहरात असंघटित बांधकाम कामगाराची नोंदणीसाठी लूट तसेच नोंदणी केलेल्या कामगाराची देखील योजनेचा लाभ घेताना मोठ्या प्रमाणात लुट होत आहे. प्रशासनाने याकडे साधी चौकशी किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांनी सदर केंद्रांना भेट सुद्धा दिली नाही राज्य सरकारचा हेतू सुद्धा आणि प्रमाणिक आहे परंतु मंठा तालुक्यात याला हरताळ फासला जात असल्याचे काम होत आहे.याकडे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवावा अशी बांधकाम कामगारांची व महिला वर्गाची मागणी आहे.
नोंदणी करायला कामगार सेवा केंद्रात गेल्यानंतर सुरुवात होती ती एका रुपयाचा कागद दहा रुपयाला इथून तर यानंतर नोंदणी करण्याचा शुल्क पाचशे रुपये, या योजनेचा लाभ आल्यानंतर वेगळा शुल्क तर यानंतर विमा , शिष्यवर्ती , रोजगार हमी योजनेची सदर नोंदणी नंतर करून लाभ व रक्कम काढून देण्यासाठी या डायरेक्ट अर्धी रक्कम संबंधित संचालकाला द्यावी लागत असल्याचा प्रकार होत आहे. सदर बाब अतिशय गंभीर असून राज्य सरकारचा योजनेला काळ फासण्याचा काम गेल्या काही वर्षापासून तालुक्यात होत आहे. याकडे मेहरबान साहेबांनी लक्ष देऊन आवाज विधिमंडळात उठवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह बांधकाम कामगार व त्यांच्या नातेवाईकातून होत आहे.