
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना घेण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सर्व मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आज दिनांक 19 मार्च, 2025 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात, बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष ढेंगळे, शिवसेना, (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानसभा समन्वयक दिपक गो. रणनवरे, प्रतिनिधी महेश भालेराव, विधानसभा अध्यक्ष, ब.स.पा.करनाडे, जालना जिल्हाध्यक्ष (महिला) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीमती नंदाताई पवार, प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सुरेश खंडाळे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी संजोग हिवाळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस गणेश चांदोडे, सिध्दीविनायक मुळे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि. 18 मार्च, 2025 रोजीची विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्येबाबत माहिती देण्यात आली.
अ.क्र. विधानसभा मतदारसंघाचे नाव पुरुष मतदार स्त्रीम मतदार तृतीय पंथी मतदार एकूण मतदार
01 99-परतूर 169127 156414 1 325542
02 100-घनसावंगी 172514 160237 1 332752
03 101-जालना 183158 165907 36 349101
04 102-बदनापूर (अ.जा.) 174574 161199 5 335778
05 103-भोकरदन 168363 155893 1 324257
एकूण 867736 799650 44 1667430
यावेळी बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीतील दुबार नावे वगळण्या ची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे बाबत सुचना केल्या. जालना शहरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीबाबत, जालना शहरातील ब-याच मतदारांकडे मतदार ओळखपत्र हे MT सिरिज (जुने) असल्याने त्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये शोधतांना त्यांची नावे मतदार यादीत आढळून येत नाहीत, तेव्हा निवडणूक आयोगाने अशा सर्व संबधीत मतदारांना नवीन मतदार ओळखपत्र देण्यात यावे अशी विनंती केली. मतदार यादी वाटपाबाबत, वयाची 18 वर्ष पूर्ण असलेल्याा नवविवाहीत तरुणींना मतदार यादीत नाव नोंदणी करतांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रा समवेतच लग्नत पत्रिका मतदार यादीत नांव नोंदणीसाठी पूरावा म्हाणून ग्राहय धरण्याीबाबत विनंती केली. निवडणूक काळात विविध राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी विकसीत केले जाणारे अॅप्सग यांना मतदारांची माहितीच्यात तपशीलाचा स्त्रोनताबाबत माहिती विचारली. मतदारांच्या मतदार यादीतील नावाबाबत व अन्यी तपशीलाबाबत गोपनीयता बाळगण्याोत यावी यासह अन्य विषयाबाबत विषयावर यावेळी चर्चा झाली.
लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1950, लोक प्रतिनिधीत्व. अधिनियम 1951,मतदार नोंदणी अधिनियम 1960 यानुसार व भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्तच होणा-या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व कामकाज पार पाडले जाते. मुख्यन निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या अधिकृत वेबसाईटवर जावून मतदार,राजकीय पक्ष/उमेदवार,भारत निवडणूक आयोगाचे विविध अॅप्सा, मतदारांसाठी मदत व सहायता, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 विषयक माहिती, निवडणूक प्रक्रिये संबंधित माहिती, भारत निवडणूक आयोगाने विकसीत केलेले आयसीटी अॅप्लीमकेशन्सक, स्वीणप जनजागृती विषयक माहिती, भारत निवडणूक आयोगाची प्रकाशने याबाबत माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्याप निर्देशानुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै आणि 01 ऑक्टोबर या दिनांकावर आधारीत मतदार नाव नोंदणी करण्यायत येते याबाबतची माहितीउपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दिली.
–