
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : श्री संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्यानिमित्त गुरुवारी (दि. 20 मार्च) पैठण येथे मोठ्या उत्साहात भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला. या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार, विविध सेवा उपक्रम राबवण्यात येतात.
भक्तगणांची सोय लक्षात घेऊन, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहराध्यक्ष जितु परदेशी मित्रमंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाण मोफत फराळ वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहराध्यक्ष जितु भाऊ परदेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बजरंग लिंबोरे, कल्याण भुकेले, फाजल टेकडी आदिंसह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. भक्तांसाठी उपवासाचे पदार्थ आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 5,000 हून अधिक भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. गाथा पारायण, हरिपाठ, भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे
शहराध्यक्ष जितु परदेशी मित्र मंडळाचे पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.