
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
(तहसीलदार सौ.उज्वला पांगारकर यांनी नुकसानभरपाई लाभ मिळणेकामी ई- केवायसी करण्यासाठी केलं शेतकऱ्यांना अहवान…)
(आतापर्यंत तालुक्यातील 45 हजार 804 शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये सदर रक्कम जमा)
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी यांचे नुकसान झाले होते म्हणून माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्याने शासनाने नुकसान भरपाई करण्यासंबंधी आदेशित केले होते त्याचे पंचनामे ही महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले होते त्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते मात्र आतापर्यंत तालुक्यातील ई केवायसी नसल्यामुळे 3232 शेतकरी नुकसानभरपाई अनुदानापासून वंचित राहणार असल्याचे तहसीलदार सौ. उज्वला पांगरकर यांनी सांगितले अतिवृष्टी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असून तालुक्यातील 45 हजार 804 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सदर रक्कम जमा झाली आहे त्यातील 691 शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी असल्यामुळे त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करावी व ते संबंधित तलाठ्याकडे सादर करावे असे आवाहनही महसूल विभागाने केले आहे तसेच तालुक्यातील 3232 शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केले नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळणार नाही व त्यानंतर तक्रार केली तरी त्याचा उपयोग होणार नसल्याचे सांगण्यात आले असून त्यात अहमदपूर मंडळात 488 अंधोरी 394 शिरूर ताजबद 717 किनगाव 607 हाडोळती 620 शेतकऱ्यांनी इ केवायसी अद्याप केली नाही सदर इ केवायसी 25 तारखेपर्यंत केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याचे तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी सांगितले