
दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे)
“सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांंची जि.प मधील अधिकाऱ्यांच्या मग्रुरी विरोधात “योगेश कदम(राज्यमंत्री ग्रामविकास व पंचायत राज) यांच्याकडे तक्रार ग्रामविकास विभागाचे सचिव तसेच मुख्यमंत्री यांनाही निवेदन देणार” ___________________________
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही अनेक ठिकाणी कमी होत आहे, याला कारणीभूत आहे शासन/प्रशासन स्तरावरील जिल्हा परिषद शाळांबाबत होत असलेली निराशाजनक कामगिरी आणि काही अधिकाऱ्यांची मग्रुरी, मौजे शिंदोडी याठिकाणी पदवीधर शिक्षकांची नियुक्ती तीन वर्ष नाही, आणि दीड वर्षापासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे पटसंख्या १५० आहे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत.
त्याकडेही कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. वारंवार शिक्षण कमिटी, ग्रामपंचायत शिंदोडी व ग्रामस्थ वारंवार विनंती करत आहेत.
“मौजे अन्नापूर तालुका शिरूर” या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकाची जागा रिक्त आहे, शिक्षण खात्याचा अजब गजब कारभार म्हणजे जवळपास दीड वर्ष उलटून गेले या शाळेवर नेमणूक असलेल्या एक शिक्षिका नियमबाह्यपणे गैरहजर आहेत मात्र त्यांची नेमणूक ही मौजे अन्नापूर या शाळेवरती होती त्या एवढ्या दिवस गैरहजर असूनही त्यांची नेमणूक कमी केलेली नव्हती, संबंधितांना आत्ताच एक दोन आठवड्यापूर्वी निलंबित केल्याची माहिती समजली , जवळपास दीड दोन वर्ष नियमबाह्य पद्धतीने ह्या शिक्षिका गैरहजर आहेत आणी अद्यापपर्यंतही त्या हजर झाल्याची माहिती नाहि, मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षिका ह्या त्यांच्या काही व्यक्तिगत आर्थिक व्यवहारांच्या कारणांमुळे किंवा इतर कारणांमुळे त्या अचानक त्यांच्या कुटुंबासह इतरत्र स्थलांतरित झाल्या असून सध्या त्या नक्की कुठे आहेत याबाबत फारशी कोणाला कल्पना नाही, परंतु यानिमित्ताने एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो आणि शिक्षण व्यवस्थेचा भोंगळ कारभार किती संताप जनक आहे हे दिसते की एवढे दिवस ह्या शिक्षिका गैरहजर असताना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित शिक्षण विभाग का खेळला? तातडीने येथे दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक का नाही केली? तसे पाहिले तर इथे एकूण तीन जागा रिक्त आहेत परंतु यामध्ये मध्यंतरी बंद पडलेल्या दुसऱ्या शाळेवरील एका शिक्षकाची तोंडी नेमणूक इथे करण्यात करण्यात आलेले आहे त्यांची कायम नेमणूक अण्णापुर शाळेत नाही किंवा तसा आदेशही नाही अशी माहिती प्राप्त असून, येथे नेमणूक असलेले “कृष्णा मगर” या शिक्षकांची नुकतीच इतरत्र बदली झाल्यामुळे ती सुध्दा जागा आता रिक्त झालेली आहे, तोंडी नेमणूक असलेले शिक्षक वगळता सद्यस्थितीत या शाळेत शिक्षकांच्या दोन जागा रिक्त आहेत, मिळालेल्या माहितीनुसार या शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असून सद्यस्थितीत शाळेमध्ये साधारणतः १२१ एवढी पटसंख्या विद्यार्थ्यांचे आहे , शिक्षण व्यवस्थेच्या या गलथनकारभारामुळे शाळेची पटसंख्या देखील झपाट्याने कमी झाली आहे आधी या शाळेला पटसंख्येनुसार मुख्याध्यापकाची सुद्धा नेमणूक होती परंतु मुख्याध्यापक नेमणुकीसाठी आवश्यक पटसंख्येपेक्षा विद्यार्थी पट खाली आल्यामुळे मुख्याध्यापक पदही इथे कमी झाले आहे,
ही गंभीर प्रकरणाबाबत गावातील “सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर” निलेश यशवंत वाळुंज” यांनी ही माहिती समजताच पंचायत समिती शिक्षण विभागात संपर्क करून याबाबत लवकर उपाय योजना होण्यासाठी विनंती केली तसेच जिल्हा परिषद पुणे येथील शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे ही फोनवरून संपर्क संदेश पाठवले परंतु या लोकसेवकानी एकदाही फोनवरून या सामाजिक समस्या जाणून घेण्याचे कष्ट घेतले नाही,
यानंतर वाळुंज यांनी “जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे” यांना देखील फोन केले व ह्या समस्येबाबत संदेश पाठवले ह्या महाशयांनी देखील फोन घेतले नाहीत आणी फोनवरून या गंभीर समस्या जाणून घेण्याचे कष्ट घेतले नाही याउलट उलट संदेश करून शिक्षणाधिकारी यांना संदेश पाठवा असे अति हुशारीचे उत्तर दिले,
यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या कार्यालयात देखील फोन केले ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे गंभीर वास्तव सांगितले परंतु गजानन पाटील यांना देखील याबाबत बोलायला वेळ नसल्याचे तेथील फोनवर उपस्थित असलेले कुलकर्णी नामक कर्मचाऱ्यानी सांगितले, सामाजिक समस्यां न जाणता एवढी मग्रुरी जर जिल्हा परिषदेमधील ह्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना असेल आणि शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्यायला किंवा बोलायला जर जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असतील तर हे लोक स्वतःला लोकसेवक समजतात की जनतेचे मालक? अशा लोकांमुळेच शिक्षण व्यवस्थेचे व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून जिल्हा परिषद शाळा बंद पडू लागल्या आहेत, अशा मग्रुर अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू द्यायचे आहेत का? यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे पुणे जिल्हा परिषदेला टक्केवारीचे ग्रहण लागलेले आहे विविध विभागांमध्ये वेगवेगळे भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत मध्यंतरीच बांधकाम विभागामध्ये मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले. जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्याच्या दालनामध्ये लाखो रुपये सापडले अशी व्यवस्था जर जिल्हा परिषदेची असेल तर या जिल्हा परिषदेवरती एखाद्या कर्तुत्ववान दबंग अधिकाऱ्याची गरज असल्याचे बोलले जात आहे
————————————————–
शिक्षण व्यवस्था उभी करण्यासाठी “महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” यांना खूप मोठ्या संकटांचा त्याकाळात सामना करावा लागला, परंतु आताही स्वातंत्र्याच्या ७६ʼʼ वर्षानंतर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेबाबत एवढी निराशा संघर्ष असेल आणि जि.प. मधील संबंधित अधिकारी एवढ्या मग्रुरीने वागत असतील,विद्यार्थ्यांच्या शिक्षणबाबत त्यांना चिंता नसेल तर हे अतिशय खेदजनक आहे, संबंधित अधिकारी हे लोकसेवक आहेत याचे त्यांनी भान ठेवावे, प्रकरणी आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याकडे तसेच ग्रामविकास विभागाचे मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि ग्रामविकास विभागाचे सचिव महोदय यांच्याकडेही निवेदन देणार आहोत,पुुणे जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या कर्तृत्ववान आणी दबंग अधिकाऱ्याची गरज आहे, जिल्हा परिषदेमध्ये सध्या टक्केवारीचे वारे वाढताना दिसत असून भ्रष्टाचारी प्रकरणांच्या बातम्या समोर येत आहेत लाखो रुपये जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्याच्या दालनामध्ये मिळून येत आहेत शासन स्तरावरून याबाबत गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे,
निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)