
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर .
पुणे : वडगाव शेरीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती सीमा ढाकणे यांच्या उपस्थितीत माझा परिसर माझी जबाबदारी यांच्या वतीने पोलीस स्टेशन येथे कायदा व सुव्यवस्था यावर उत्साहात बैठक पार पडली.दि. २२ मार्च रोजी पोलीस अधिक्षक सीमा ढाकणे यांनी चंदननगर वडगाव शेरी पोलीस स्टेशन येथे मुख्यमंत्री यांचे राज्याच्या सर्वागीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानी १०० दिवसाचा आराखडा तयार करुन ठोस कामगिरी करण्याचे निर्देश दिल्याप्रमाणे जनतेच्या तक्रारी ऐकून त्या निवारण करण्याकरिता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला.
पोलीस अधिक्षक सीमा ढाकणे यांनी नागरिकांची बैठक घेतली. व त्यात सामाजिक सलोखा योग्य प्रकारे कसा राखला जाईल याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या.सदर शांतता कमिटी बैठकी करिता पोलीस ठाणे वडगाव शेरी येथील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. पोलीस अधिक्षक सीमा ढाकणे यांनी रस्ता सुरक्षा, नविन कायदे यातील बदल, महिला व बालकांची सुरक्षा,सायबर जागृती बाबत माहिती देवुन मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाणे परिसर स्वच्छ ठेवणे बाबत मार्गदर्शम व सुचना दिल्या.
संपुर्ण बैठकीतील संवाद हा जागरुक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांचेमध्ये ‘ सुर मिले मेरा और तुम्हारा तो दस्तुर हो जाए जमाना ‘ या प्रकारचाच होता असं म्हटलं तर वावगं ठरु नये. यावेळी सोशल मीडियाचा योग्य वापर, समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा घटनाना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी केले.यावेळी मीटिंगमध्ये माजी सैनिक विकास संघटना वडगाव शेरी खराडी, या संघटनेचे अधिकारी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.