
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक – अवधूत शेंद्रे
श्री.संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल नवीन इमारतीचे व कर्डीयाक कॅथलॅबचे उदघाटन
————————————–
अमरावती :- श्री.संत अच्युत महाराजांनी दहा,दहा रुपये जमा करून गोरगरिबांची निशुल्क सेवा करण्यासाठी हॉस्पिटल उभे केले संत तुकाराम यांनी जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले तेथेच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा हिच मानवतेची शिकवण पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि संत अच्युत महाराजांनी आपल्या कर्तव्यातून दाखवून दिली असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती लगतच्या मार्डी येथील श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन आठ मजली भव्य हृदयरोग उपचार इमारत व कर्डीयाक कॅथलॅबच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले यावेळी मंचावर हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर,संत सचिन देव महाराज,सचिव प्रा. सागर पासेबंद, हॉस्पिटलचे उपाध्यक्ष सुधीर दिवे,खा.अनिल बोन्डे,आ.संजय खोडके,आ सुलभा खोडके,आ.प्रवीण पोटे, आ.दादाराव केचे,आ.सुमित वानखेडे,आ.उमेश यावलकर,आ. प्रताप अडसड आ. केवलराम काळे,आ.राजेश वानखडे, जनार्दन बोथे,आ. प्रवीण तायडे, कोषाध्यक्ष मुकुंद वाईकर, विश्वस्त रमेश सावरकर, मनोज वाडेकर, नितीन कोल्हटकर, सुधीर जोशी, शरद असेकर, डॉ.मुरलीधर वाडेकर, सुबदा पोतदार आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, गरिबांची सेवा केल्याने आपले जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही, समाज घडत असताना माणसे कशी घडवावीत हे संत अच्युत महाराजानी कर्तुत्वातून दाखवून दिलं तर हॉस्पिटल ट्रस्टीनी एक व्हिजन तयार करावे त्यात मेडिकल, नर्सिंग कॉलेज, फुफ्फुस, हृदयरोग प्रत्यारोपण सुविधा आणि रुग्णांच्या नातेवाईकासाठी धर्मशाळा इत्यादींचा समावेश असावा त्यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने कुठलीही कमतरता राहणार नाही त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली
श्री.संत अच्युत महाराजांच्या आशीर्वादमुळेच गोरगरिबांची सेवा करणे शक्य- डॉ. अनिल सावरकर
श्री संत अच्युत महाराजांनी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर एका वटवृक्षात झाले त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून ईश्वर चिंतन, अध्यात्मिक चिंतन धर्मग्रंथाचे विस्तृत अभ्यासू पद्धतीने केलेले लेखन त्यांची तपश्चर्या आणि सेवा आज समाजातील गोरगरिबापर्यंत दवाखाना आणि साहित्याच्या माध्यमातून पोहचत असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असल्याचे सांगितले
श्री.संत हार्ट हॉस्पिटलमध्ये दवा सोबत दुवा मिळते–संत सचिन देव महाराज
संत सचिन देव महाराजांनी आपल्या छोटे खाणी भाषणात श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये आजरोजी ६५ हजाराच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया पार पडल्या असून यात दवासोबत दुवाही असल्याचेही म्हटले हा सोहळा राजकारनी नसून श्री.संत अच्युत महाराजांच्या कार्यपूर्तीचा सोहळा असल्याचे म्हटले
राष्ट्रसंतांची अपेक्षित ग्रामोन्नती संत अच्युतांनी आकारली- सुधीर दिवे
श्री संत अच्युत महाराजांची अत्यंत साधी राहणी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणे आणि राष्ट्रसंतांचा व गाडगे बाबांचा मानवतावाद आपल्या जीवनात अंगीकारला त्यांचे जीवनचरित्र एक चालते, बोलते विद्यापीठच होते श्री संत अच्युत महाराज यांना १९९५ मध्ये राम शेवाळकर पुरस्कार तर १९९८ मध्ये डी. लिट पदवी मिळाल्याचे सांगितले यावेळी साने गुरुजी मानव सेवा संस्थानचे नावे ६ कोटी ८८ लाख रुपयाचा धनादेश विश्वस्तांना प्रदान करण्यात आला तर हार्ट हॉस्पिटलचे उपाध्यक्ष सुधीर दिवे आणि मनोज वाडेकर यांचा नामदार गडकरी यांचे हस्ते उजवा आणि डावा हात म्हणून संत सचिन देव महाराज यांच्या सूचनेवरून सत्कार करण्यात आला तर हार्ट हॉस्पिटलच्या कर्डीयाक कॅथलॅब विषयी हृदयरोग तज्ञ डॉ. शिवराज शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माहिती दिली तर हार्ट हॉस्पिटलच्या उगमस्थान ठरलेल्या नशिबा बानो यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सदर भव्यदिव्य कार्यक्रमाचे संचालन सुधीर दिवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सागर पासेबंद यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात संत अच्युत महाराज यांचा विविध कानाकोपऱ्यातील चाहता वर्ग आणि डॉक्टर, नर्सेस, आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.